हत्तुरे वस्ती येथील नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन

shivrajya patra

सोलापूर : मजरेवाडी परिसरातील हत्तुरे वस्ती येथील मल्लिकार्जुन नगरात नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्तिक महिन्याचे औचित्य साधून उत्पत्ती एकादशीनिमित्त शनिवारी, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी  11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व सुविद्य पत्नी विद्या हत्तुरे या दांपत्याच्या शुभहस्ते मंत्रोच्चारांसह भूमिपूजनाची पारंपारिक पूजा करण्यात आली. 
यावेळी या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वारकरी संप्रदायाचे ह भ प निवृत्ती ताकमोगे महाराज यांनी भूषवले. 

ताकमोगे महाराज म्हणाले हत्तुरे वस्तीचे संस्थापक कैलासवासी सिद्रामप्पा हत्तुरे यांचे स्वप्न त्यांचे नातू विजयकुमार हत्तुरे यांनी पूर्ण केले. या पंचक्रोशीतील भाविकांना व वारकरी संप्रदायातील सेवेकरी यांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन होणार आहे. हत्तुरे यांचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले.

याप्रसंगी नागेश इनामदार, वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष ह भ प संजय पवार, आप्पा माने महाराज,अच्युत मोफरे, जाधव, राऊत,अनिल देठे, बाळू कवडे, दीपक हरवाळकर, संत सेना महाराज संप्रदायाचे ह भ प रामलू कोंडूर, पांडुरंग चौधरी सर, सदगुरु परिवाराचे राजू कोल्हे, माजी नगरसेवक दत्ता ताकमोगे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी, राधाकृष्ण पाटील, प्रा. संजय बनसोडे, रायगोंडा बिराजदार, पत्रकार अजित उंब्रजकर, मंदिराचे मूर्तिकार सगर, अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कुंभारी महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे उपाध्यक्ष संजय चाबुकस्वार, चंद्रकांत कळकेळी, मजरेवाडी चे स्वामी, राजशेखर हत्तुरे, नागेश हत्तुरे, रवी बडवणे, पंचप्पा शिंदगी, प्रसाद चोरगी, लोणी, गणेश धोकटे, ओंकार हत्तुरे, इराप्पा पटणे, सिद्धार्थ हत्तुरे, संदेश हत्तुरे, रवी बनसोडे, बबलेश्वर, भूषण, नकाते, फुंडीपल्ले, सोलापुरे, बिराजदार, भैरू कांबळे, माळी, सिद्धाराम सालीमठ, रमेश जेऊरे, बजरंग तल्ले, शुभम हरकारे, योगीनाथ कापसे, राम मोरे, किरण राठोड, चंदू ख्याडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या भूमिपूजन सोहळ्यामुळे हत्तुरे वस्ती, मजरेवाडी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

To Top