मुस्लिम बांधवांच्या हाती “मशाल”… शिवसेनेच्या विजयाचा निर्धार !

shivrajya patra

सोलापूर : शहर मध्य विधानसभा- प्रभाग 21 परिसरातील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मकानदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश झाला.

इस्माईल मकानदार यांच्या प्रवेशामुळे शहर मध्य विधानसभा परिसरात राष्ट्रप्रेमी मुस्लिम समाजात शिवसेनेच्या विचारांना नवे बळ मिळालं आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वावर वाढता विश्वास व्यक्त करत अनेक मुस्लिम बांधव शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहेत.

या उपक्रमासाठी सातत्याने प्रयत्न करणारे पत्रकार व शिवसैनिक सिकंदर नदाफ यांच्या मेहनतीला यश आले. “शहर उत्तर व शहर मध्य” मधील मुस्लिम समाजाला शिवसेनेच्या भूमिकेशी जोडण्याच्या त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख जिल्हाध्यक्ष डॉ. प्रा. दासरी यांनी केला.

जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून भविष्यातील संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अंबादास चव्हाण, सुशील उपलप, महिबूब पठाण, सिकंदर नदाफ, शाम कदम, महिबुब पठाण, अमजत मुल्ला, हाजी शेख, युवराज गायकवाड, रियाज बागवान, रशीद शेख, अल्ताफ शेख, शाहरुख पठाण., राजु खान पठाण, शाहिद शेख, जाबीर शेख, रफीक शेख, मोहसीन पठाण, तौसिफ शेख, इकरार शेख, शाहनवाज शेखसंधी, महिबुब अत्तार, सद्दाम नदाफ, मोहसीन धोटेघर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top