सोलापूर : सामान्य प्रशासन विभागाचे 26 सप्टेंबर 2012 च्या परिपत्रकानुसार तालुका, जिल्हा/महानगरपालिका, विभागीय, मंत्रालय स्तरांवरील लोकशाही दिन अंमलबजावणीबाबत एकत्रित आदेश दिलेले आहेत. परिपत्रकातील कलम 5.7 नुसार लोकशाही दिन केव्हा होणार नाही, याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये ज्या-ज्या क्षेत्रांमध्ये निवडणूकीकरीता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशा ठिकाणी त्या स्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येनये अशा सूचना दिलेल्या आहेत.
नगरपालिका/नगरपंचायत निवडणूकीची आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी होणार असून निकाल 3 डिसेंबर रोजी आहेत, परंतु निकालाची घोषणा 8 डिसेंबर 2025 रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तालुकास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही. तसेच 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन देखील करण्यात येणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
