आमदार कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ-रूबिक्स क्यूब स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

shivrajya patra

सोलापूर : अक्कलकोट विधानसभा मतदार संघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी आयोजित बुद्धिबळ आणि रूबिक्स क्यूब स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद  मिळाला. पंचक्रोशीतील तब्बल १७० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

जलसमृद्धी व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला, येथे आयोजित बुद्धिबळ आणि रूबिक्स क्यूब स्पर्धेत कासेगांव, उळेवाडी, उळेगांव, गंगेवाडी, वडजी, बक्षी हिप्परगा आणि मुळेगांव या गावांमधून १७० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

या स्पर्धांमुळे मुलांचा बौद्धिक विकास, एकाग्रता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढीस लागते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार, स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढविण्याचे हे उपक्रम उद्दिष्ट ठेऊन आयोजित करण्यात आले.

यावेळी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके, दिलीप चौगुले, राजेश जगताप, यशपाल वाडकर, परशुराम कोळी, मुख्याध्यापक रमेश शिंदे, रामप्पा चौगुले, बालाजी चौगुले, चंद्रकांत चव्हाण, प्रवीण चौगुले, विश्वजित चौगुले, सरकार पाटील, शिक्षक, पालक, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष नेताजी खंडागळे आणि जलसमृद्धीचे दत्ता डांगे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले व मुलांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमाबद्दल पालक आणि ग्रामस्थांनी आयोजकांचे मनःपूर्वक कौतुक केले.

To Top