ग्रामदैवत यल्लमादेवी यात्रा महोत्सवास सोमवारी प्रारंभ

shivrajya patra

दसूर : माळशिरस तालुक्यातील दसूर येथील ग्रामदैवत यल्लमादेवी यात्रा महोत्सव-२०२५ सोमवारी, 01 ते बुधवारी, 03 डिसेंबर दरम्यान उत्साहात साजरा केला जाणार आहे. सालाप्रमाणे यंदाही विविध धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक

सोमवार-01 डिसेंबर रोजी सायंकाळी 05.00 वा. गावातून पालखीचे मंदिराकडे प्रस्थान व ओटी वाहिनी पूजन.

मंगळवार-02 डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वा. महापूजा व नैवेद्य. सायंकाळी 06.00 वा. पालखीबरोबर कोल्हापूर ऑर्केस्ट्राचे सादरीकरण.

मुख्य दिवस-बुधवार- 03 डिसेंबर रोजी पालखी मिरवणूक, माहेरघर घेणे व दुपारी ४.०० वा. अभिषेक.

यात्रेचे सर्व आयोजन संपूर्ण ग्रामस्थ, दसूर व पुजारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांनी या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.


To Top