डॉ. अल्लामा इक्बाल हे उर्दू आणि फारसीचे चांगले कवी होते : डॉ. अब्दुल रशीद शेख

shivrajya patra

सोशल महाविद्यालयात उर्दू विभागात 'जागतिक उर्दू दिन' उत्साहात साजरा

सोलापूर :  सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या उर्दू विभागाने जागतिक उर्दू दिनाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीचे संचालक इक्बाल बागबान आणि उर्दू आणि फारसी तज्ज्ञ शिक्षक, प्रा. डॉ. अब्दुल रशीद शेख हे या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर सोशल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थिनी अर्शिया शेख यांनी पवित्र कुराण पठण करून केली. त्यानंतर उर्दू विभागाचे उपविभागप्रमुख प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांनी कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्दिष्टे स्पष्ट केले.

स्वागत आणि प्रास्ताविक भाषणानंतर प्र. प्राचार्य डॉ. इक्बाल तांबोळी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. 

इक्बाल बागबान यांनी सांगितले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात उर्दू भाषेचा स्वतःचा वेगळा आणि उच्च दर्जा आहे. उर्दूच्या माध्यमातून पत्रकारितेला एक नवीन दिशा आणि गती मिळाली आहे. आज उर्दूमध्ये असंख्य मासिके आणि वर्तमानपत्रे येत आहेत, हेही लक्षवेधक आहे.

प्रा. डॉ. अब्दुल रशीद शेख यांनी आंतरराष्ट्रीय उर्दू दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, आजचा हा दिवस जगभरात ज्येष्ठ कवी डॉ. अल्लामा इक्बाल यांच्या जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांनी अल्लामा इक्बाल यांच्या या कवितेने आपल्या भाषणाची सुरुवात केली. 

"की मुहम्मद से वफा तो ने तो हम तेरे हैं

ये जहाँ चिज है क्या लोह कलम तेरे हैं"

त्यांनी अल्लामा इक्बाल यांच्या जीवन उर्दू आणि फारसी कवितेबद्दल संक्षिप्त आणि व्यापक पद्धतीने विस्तृत माहिती दिली. 

यावेळी डॉ. प्रा. अब्दुल रशीद शेख यांनी, अल्लामा इक्बाल यांच्या उर्दू आणि फारसी संग्रहांचा थोडक्यात आढावा घेतला आणि अल्लामा इक्बाल यांचे स्थान आणि स्थिती स्पष्ट केली. 

अध्यक्षीय भाषणात डॉ. तांबोळी म्हणाले की, उर्दू भाषेचे महत्त्व आणि उपयुक्तता यावर माहितीपूर्ण मार्गदर्शन करताना, स्वातंत्र्यलढ्यात या भाषेला उच्च स्थान आहे. उर्दू भाषा ही हिंदू आणि मुस्लिमांमधील ऐक्य आणि सामाजिकतेची, गंगा-जमनी संस्कृतीची एक संस्मरणीय संपत्ती आहे.  

भारताच्या स्वातंत्र संग्रामात उर्दू भाषेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी भाषणे आणि घोष वाक्य हे उर्दूमध्ये देण्यात आल्या होत्या, असंही डॉ. तांबोळी यांनी यावेळी सांगितले.

प्रा. डॉ. गौस अहमद शेख यांनी तयार केलेली उर्दू पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले आणि निबंध लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. डॉ. कादीर बिजापुरे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. तस्नीम वड्डो यांनी उपस्थितांचं आभार व्यक्त केले.

To Top