नानासाहेब देशमुख यांचं निधन; भा. ज. प. शहराध्यक्षा तडवळकर यांना पितृशोक

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर बाजार समिती चे माजी संचालक, कस्तुरबा भाजी मंडई चे माजी अध्यक्ष टिळक चौक गणेशोत्सव मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, भारतीय जनता पक्षाचे पहिल्या फळीचे कार्यकर्ते नानासाहेब देशमुख यांचे शनिवारी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी 95 वर्षीय होते.

त्यांचा अगदी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, जनसंघ अन् भारतीय जनता पार्टी असा राजकीय प्रवास होता. पहिल्या संघबंदीच्या काळात त्यांनी कारावासही भोगला होता. 

जुन्या काळातील विज्ञान शाखेचे ते पदवीधर असूनही भाजीपाला अडत व शेती व्यवसायाला त्यांनी प्राधान्य दिले होते. विरभद्र शक्ती पुजा मंडळ  तसेच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे देखिल त्यांनी काम पाहिले. अनेक कुस्ती फडात त्यांनी पंच म्हणून काम पाहिले होते. 

त्यांची अंत्ययात्रा टिळक चौक येथील त्यांच्या राहत्या घरातून सकाळी 10.30 वाजता निघेल, असं सांगण्यात होतं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, 05 मुली-जावई-नातवंडे असा परिवार आहे. भा. ज. प. शहराध्यक्षा सौ. रोहिणी तडवळकर यांचे वडील होत.

To Top