सोलापूर/अजिम शेख : केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात CEIR Portal सुरु करण्यात आले आहे. त्या आधारे सुमारे 46,20,000 रुपयांचे विविध कंपन्यांचे 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस माहिती कक्षाकडून एका प्रसिद्धीपत्रकान्वये देण्यात आलीय.
या CEIR Portal द्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर शहरातून गहाळ झालेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती प्राप्त करुन घेऊन त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरकडील तपास पथके वेगवेगळ्या परजिल्ह्यात तसेच परराज्यात पाठविण्यात आली होती. 
या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी CEIR Portal व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले 46,20,000 रुपये किंमतीचे विविध कंपन्यांचे 231 मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त, श्रीमती अश्विनी पाटील, सर्व पोलीस ठाण्याकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोह/महंमद रफिक इनामदार, पोह संतोष पापडे, पोह एकनाथ उबाळे, पोह/शंकर भिसे, पोकॉ समाधान मारकड, पोकॉ संतोष वायदंडे, पोकॉ कल्लप्पा देकाणे, पोह खाजप्पा आरेवनवरु, पोकॉ/दत्ता मोरे, पोकॉ सुधाकर माने, पोकॉ पंकज घाडगे, पोकॉ शैलेश स्वामी, पोकॉ महेंद्र फुलारी, पोकॉ बाबुराव क्षिरसागर, पोह/अयाज बागलकोटे, पोह/प्रकाश गायकवाड, पोकॉ अर्जुन गायकवाड, पोकॉ/सैफअली मुजावर यांनी पार पाडली. 
ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले आहेत, त्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या गहाळ मोबाईलचा शोध होण्यासाठी ceir.gov.in या वेबसाईडवर जाऊन माहिती भरुन सहकार्य करावं, असं आवाहन सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.
