मोहोळ : मोहोळ नगर परिषदेमधील पाणी पुरवठ्याशी संबंधित अधिकारी, मुकादम व चावीवाला यांच्या संगनमताने शहरात अनधिकृत नळ कनेक्शन चे पेव फुटले आहे. अनेकांना अनधिकृत नळ कनेक्शन देऊन व अधिकृत असणाऱ्या नळ धारकांना महिन्यातून वीस दिवसाला एक दिवस पाणीपुरवठा मुकादम चावीवाल्याच्या संगणमताने होत असल्याचा आरोप अधिकृत जोडणी असलेल्या नळधारकांचा आहे.
अधिकृत नळजोडणीधारक नागरिकांना अधिकारी मुकादम व चावीवाला पाणीपुरवठा न करता पाण्यावाचून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे मोहोळ शहर परिसरातील अनधिकृत नळधारकांना पाण्यासाठी भटकंती करुन पाणी भरावं लागतंय अथवा पाणी विकत घेण्याला पर्याय उरत नसल्याने कृत्रिम पाणी टंचाईला तोंड द्यावं लागतंय.
अधिकृत नळ जोडणी धारकांना वीस दिवसाला एक दिवस पाणी व अनधिकृत न धारकांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा अधिकारी मुकादम व चावीवाल्याच्या संगणमताने होत असल्याचा अधिकृत नळ जोडणी धारकांचा आक्रोश आहे. अनधिकृत नळ कनेक्शन ज्यादा पैसे आकारून नळ कनेक्शन देतात, अशी माहिती काही निवडक नळ कनेक्शन धारकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 
मोहोळ नगरपरिषदमधील संबंधित अधिकारी मुकादम व चावीवाला यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोपही नागरिकांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन अनधिकृत कनेक्शन बंद करून अधिकृत नळ कनेक्शन धारकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ही अधिकृत नळ जोडणी धारकांनी केलीय .
