भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हारुण पठाण यांचं निधन

shivrajya patra

सोलापूर : भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रणजितसिंह मोहिते पाटील बालक मंदिर,आशा मराठी विद्यालय व श्री. धर्मण्णा सादूल प्रशालेचे संस्थापक-अध्यक्ष हारुण महामूदखां पठाण यांचं अल्पशः आजाराने शुक्रवारी निधन झाले. ते मृत्यूसमयी 70 वर्षीय होते. त्यांचा असर नमाजनंतर सायंकाळी 5:00 वा. नंतर जडेसाब कब्रस्तान इथं दफन (सुपूर्द-ए-खाक) विधी झाल्याचं सांगण्यात आलंय.

औद्योगिक वसाहतील निलम नगरसारख्या कामगार वस्तीत पहिल्यांदाच शिक्षणाची गंगा आणणारे हारुण महामूदखाँ पठाण यांच्याकडं आदरानं पाहिलं जात होतं. मूळचे साखरपेठेतील रहिवासी असलेले हारुण महामूदखाँ पठाण हल्ली मार्कंडेय नगरात वास्तव्यास होते. ते जोडबसवण्णा चौकातील अकबर कासीम मशिदीचे ट्रस्टी म्हणूनही सर्व परिचीत होते.

त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, सून तसेच नातवंडे असा परिवार आहे.

To Top