शालेय ज्युडो स्पर्धेत 40 किलो वजनी गटात कृष्णा वाडकर प्रथमस्थानी

shivrajya patra

कासेगांव : शालेय शहरस्तरीय ज्युडो स्पर्धेत 40 किलो वजनी गटात कृष्णा शिवानंद वाडकर यांनं प्रथम क्रमांक पटकावला. सरपंच यशपाल वाडकर यांनी त्याचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सोलापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय अंतर्गत, 17 व 18  ऑक्टोबर दरम्यान राजश्री शाहू महाराज जिमखाना इंदिरा गांधी स्टेडियम पार्क चौक इथं पार पडलेल्या शालेय शहरस्तरीय ज्युडो स्पर्धेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवचा पैलवान कृष्णा वाडकर प्रथमस्थान पटकाविले. त्याची अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा येथे होणाऱ्या पुणे विभागीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली.

कृष्णा वाडकर याच्या नेत्रदिपक यशाप्रित्यर्थ लोकरत्न परिवाराच्या वतीने महात्मा गांधी ग्राम तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष तथा पहेलवान अल्लाऊद्दीन शेख यांच्या हस्ते सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले.

या खेळाडूला प्रशिक्षक सोमनाथ मगर व‌ वस्ताद शिवाजी मिटकरी यांनी मार्गदर्शन लाभले. सरपंच यशपाल वाडकर यांनी त्याचं अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


To Top