'लक्ष्मी' दर्शनास गेलेला तरुण बेपत्ता ! ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने घराकडं फिरवली पाठ

shivrajya patra

सोलापूर : 'महा लक्ष्मी ' चे दर्शन घेण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या तरूणानं घराकडे पाठ फिरवण्याचा चिंताजनक प्रकार पुढे आलाय. ही घटना येथील मोदीखाना परिसरात, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी घडलीय. चिन्मय प्रशांत साळुंखे असं बेपत्ता तरुणाचं नांव असून त्यांनी ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरल्यानं घरी परतणार नसल्याचा मेसेज करून निघून गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलंय.

मोदीखाना परिसरातील रहिवासी 20 वर्षीय चिन्मय साळुंखे हा डिप्लोमाधारक विद्यार्थी असून त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी निघाल्याचे सांगून घर सोडले होते. काही वेळानंतर मोबाईलवरून 'मी ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरलो तर मी घरी येत नाही' असा मेसेज केला. त्यानंतर तो घरी परतला नाही.

त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो मिळून न आल्याने, बहिण वन्सिका साळुंखे हिने सदर बझार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केलीय. त्यानुसार त्याची बेपत्ता रजिस्टरला नोंद करण्यात आलीय.

चिन्मयच्या अंगावर नेसणेस कपडे काळा टि शर्ट व ट्रॅक पॅन्ट, उंची 05 फुट 03 इंच, रंग- सावळा, बोली भाषा मराठी आणि शरीरयष्टी सडपातळ बांधा असं बेपत्ता मुलाचं वर्णन आहे. 

तो आढळल्यास सदर बझार पोलीस ठाणे वा सदर बझार पोलीस स्टेशन पोना/196 एस. बी. माडे यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्याचं आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.


To Top