सोलापूर : येथील नवी पेठेतील जुने व्यापारी सरगम शॉपीचे केशवजीभाई लधुभाई गोगरी उपाख्य पारसमामा यांचं शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते मृत्यूसमयी ८५ वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या, रविवारी सकाळी ९:३० वाजता त्यांच्या रेल्वे लाईन्स आशीर्वाद अपार्टमेंट येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार असल्याचं सांगण्यात आलंय.
त्यांच्या पश्चात २ विवाहित मुले, एक विवाहित मुलगी, नातू, नातवंडे असा परिवार आहे.
