या उर्दू शिका ... ! उर्दू घर येथे मोफत उर्दू वर्गाचे आयोजन

shivrajya patra

सोलापूर : सिव्हील हॉस्पिटलसमोरील सोलापूर उर्दू घर येथे उर्दू भाषा शिकण्यास इच्छुक असलेल्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. मागील वर्षी उर्दू भाषा अभ्यास वर्गाची पहिली तुकडी तयार होऊन उर्दू भाषा शिकले. या वर्गात सोलापुरातील सर्व क्षेत्रातील नामांकित विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

शासकीय अधिकारी, निवृत्त कर्मचारी, कर्मचारी, कलावंत व व्यवसाविक तसेच इतर उर्दू भाषा अवगत करून आपले कोर्स पूर्ण केले. मोफत उर्दू भाषा अभ्यास वर्ग हे सोलापूर उर्दू घरतर्फे अविरत चालणारा उपक्रम आहे. उर्दू घरचे संचालक अ. मजीद शेख हे या अभ्यास वर्गाचे प्रमुख शिक्षक आहेत. 

आता याही वर्षी उर्दू घरतर्फे उर्दू भाषा अभ्यास वर्ग प्रत्येक शनिवारी सायंकाळी ५.०० वा. सोलापूर उर्दू घर येथे चालविले जाणार आहे. उर्दू भाषा शिकणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. या उर्दू भाषा शिकण्यासाठी कोणत्याही वयोगटाची मर्यादा नाही.

तरी सर्व उर्दू भाषा वर्ग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उर्दू घरचे व्यवस्थापक राजा बागवान (9422532786) यांनी केलं आहे. इच्छुकांनी आपली नांवे ग्रंथपाल साहीर नदाफ (9822809332) व वर्ग शिक्षक अ. मजीद शेख (9371555142) यांचेकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आलंय.


To Top