रोटरी क्लब सोलापूर स्मार्ट सिटीतर्फे भाऊबीज साजरी

shivrajya patra

उत्तर सोलापूर :  रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची इथं वंचित आणि गरजू महिलांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. या उपक्रमांतर्गत एकूण ५० महिलांना साडी व फराळाचे वाटप करून स्नेहपूर्वक उत्सव साजरा करण्यात आला.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच सुनिल जाधव, ग्रामपंचायत सदस्य तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष रोट. अकबर नदाफ, सचिव रोट. बसवराज बिराजदार, संचालक व सदस्य रोट. नागेश शेंडगे, रोट. महेश साळुंके, रोट. सत्यम दूधनकर, रोट. भारत कदम, रोट. संतोष सावळगी, रोट. शिवगंगा मैंदर्गी, रोट. स्वाती मनसावाले उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रोट. अकबर नदाफ यांनी केले तर सचिव रोट. बसवराज बिराजदार यांनी  उपस्थितांचं आभार मानले. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन सुहास भोसले यांनी केले. 

या उपक्रमातून गुळवंची परिसरात “सेवा हीच परमपूजा” या रोटरीच्या तत्त्वज्ञानाचा सशक्त संदेश पोहोचला.

To Top