खो-खो स्पर्धेत श्रीराम बीसीए बीसीएस महाविद्यालय अजिंक्य

shivrajya patra

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय, मंगळवेढा या महाविद्यालयामध्ये खो-खो स्पर्धेत श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पानीव या महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला. 

स्पर्धेत संघाने विलक्षण समन्वय, चपळाई आणि खेळातील तंत्रज्ञान दाखवत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयाचे नाव संपूर्ण विद्यापीठात उजळले आहे. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक प्रा. घुले, प्रा. वाघमोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, मार्गदर्शक श्रीलेखा पाटील, उपाध्यक्ष करण पाटील, सचिव अॅड. अभिषेक पाटील, सहसचिव डॉ. समीर पवार, विशेष कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वनवे, महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र डावकरे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

पानीव : विजेत्या संघाबरोबर संस्थेच्या मार्गदर्शक श्रीलेखा पाटील.

शब्दांकन : संजय निंबाळकर, अकलूज.

To Top