भारतातील समूळ समस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने प्रयत्न
समस्यावर नाही तर समस्येच्या कारणावर रस्त्यावर उतरून भंडारावासीयांचा प्रहार
भंडारा : भारत मुक्ती मोर्चा आणि 100 सहयोगी संघटना च्या संयुक्त विद्यमाने भारतातील 36 राज्याच्या 3 हजार तालुक्यातील 22 हजार विभागातुन 6 लाख गावातील लोकांना सोबत घेऊन ह्या राष्ट्रव्यापी जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील लोकांनी सुद्धा यात आक्रमकता दाखवून भाग घेतला होता.
लोकांचा मतदानाचा मूलभूत अधिकार, संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ,मूलनिवासी लोकांचे अधिकार वाचविण्यासाठी, अन्यायकारक शासनाच्या विरोधात देश विरोधी नीतीचा पुरजोर विरोध करण्यासाठी भारतातील 650 जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश रॅली काढण्यात आली
प्रमुख मागण्या
ईव्हीएम बंद, बैलट पेपर चालू, सर्व जातीची जातनिहाय जनगणना करून सर्व जातीला लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण देणे, आदिवासींवर होणाऱ्या अत्याचार विरोधात, अल्पसंख्याकाच्या सुरक्षितेच्या बाबतीत, पदोन्नतीसाठी, महाबोधी महाविहार ब्राम्हणाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी, शेतकऱ्यांना MSP लागू करून IRMA हा कायदा लागू करण्यासाठी, ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देणे, कर्जमाफी करणे, महिलांच्या सुरक्षितेच्या बाबत, बेकायदेशीर बेरोजगारी समूळ नष्ट करण्यासाठी, धर्माणतरीत लोकांना सुरक्षा देणे, कंत्राटी पध्दत बंद करणेबाबत, सर्व कामगार आणि कर्मचारी याना पेन्शन लागू करणे, अन्यथा आमदार-खासदार मंत्री-संत्री यांची पेन्शन बंद करणेबाबत, खाजगी क्षेत्रात आरक्षण आणि पेन्शन लागू करणेबाबत, देशविरोधी नविन शिक्षा नीती रद्द करावी, वन नेशन वन एजुकेशन लागू करणे, 
खाजगी क्षेत्रातील फी वाढी विरोधात, EWS आरक्षण देश आणि संविधान विरोधात असल्याने बंद करणेबाबत, देशातील जल जंगल जमीन हवा पाणी अन्न यांच्या प्रदूषणा विरोधात, मूलनिवासी महापुरुष यांचे स्मारक सुशोभित करण्यासाठी, देशविघातक आणि देशविरोधी धोकादायक गुलाम बनविणाऱ्या न्यू वर्ल्ड ऑर्डर चा एक षड्:यंत्र असणाऱ्या स्मार्ट डिजिटल प्रीपेड रिचार्जवाल्या मीटर विरोधात आक्रमक भूमिका घेत हा मोर्चा शास्त्री चौक ते त्रिमूर्ती चौक ह्या मार्गाने आल्यावर मोर्चाचे मोठ्या विशाल जन सभेत रूपांतर झाले, नंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले , मागण्या पूर्ण न झाल्यास भारत बंद चे कायदेशीर मार्ग अवलंबून रस्त्यावर येण्याची भाषा लोकांनी केली आहे.
स्मार्ट मिटर च्या त्रासाला कंटाळलेल्या आंदोलकांनी सांगितले की, स्मार्ट मीटर लावणे सरकारने बंद केले नाही तर आणि लावणारावर गुन्हा दाखल केला नाही तर, आम्ही या देशाचे मालक जनता घरी लावलेले स्मार्ट मीटर काढून विद्युत विभागाच्या कार्यालयात हार घालून सन्मानाने वापस करण्याची राष्ट्रव्यापी मोहीम चालवू, असा धमकीवजा इशारा जनता जनार्धनाने दिला आहे , शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर याचे गंभीर परिणाम होतील, असं दिसते.
