हुगार कलातंड मेलोडीज ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून नवरात्र महोत्सव टाकळीत मातेश्वरी देवीचा जागर

shivrajya patra

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील टाकळी येथे मातेश्वरी देवी यात्रेनिमित्त यंदाच्या वर्षी नवरात्र महोत्सवात टाकळीचे स्थानिक कलाकार विश्वा काटे, बिरु वग्गे, माळु पुजारी, क्वीन सोना कांबळे, कविता कलबुर्गी, पार्वती सुलेरजवळगी, श्वेता माशाळ, सोमु टाकळी यांच्या हुगार कलातंड मेलोडीज ऑर्केस्ट्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

आई राजा उदो उदो... सदानंदीचा उदो उदो ... अशा घोषणात टाकळीचा परिसर घुमून गेला होता, निमित्त होते नवरात्र महोत्सवाच्या ज्योत आगमनाचे… सालाबादाप्रमाणे यंदाही नविन टाकळी येथील श्री मातेश्वरी देवी नवरात्र महोत्सव कमिटीच्या वतीने तुळजापुर येथून ज्योत प्रज्वलित करून टाकळी येथे मोठ्या भक्तिभावाने आणण्यात आली.

टाकळी इथं नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. घटस्थापनेपासून ते दसरा सणापर्यंत गावातील स्थानिक महिला एकत्रित येऊन देवीचा जागर करतात. 

या नवरात्रोत्सवात ऑर्केस्ट्राचे प्रमुख गायक प्रशांत कराटगी यांनी कन्नड जानपद गाऊन लोकांचे मनोरंजन केले. आईची महती सांगणारे कन्नड गीत गाऊन लोकांचे प्रबोधन केले.

या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे उद्घाटन टाकळीचे रवी बगले, दीप प्रज्वलन उपसरपंच सिद्धाराम घोडके, अंबादास दूधभाते, दयानंद दूधभाते, शिवशरण दूधभाते यांनी तर माता अंबाबाई व अंबाबाईंचे नितीन भक्ती करणारे रत्‍नाबाई लोणीकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस विजय बनसोडे, मडिवाळेश्वर कट्टीमनी, दिलीप चांदकवटे, रमेश साबळे, सिद्धप्पा तेली यांच्या हस्ते करण्यात आले. 

मंदिराचे पुजारी विद्यानंद लोणीकर, शांतप्पा दुधभाते, राजशेखर गायगवळी, बसवराज सुतार, सिद्धाराम मधुरे, श्रीकांत सुतार, शिवानंद मगी  यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन टाकळीचे ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी केले. 

या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महिला व युवकांची मोठी गर्दी होती. युवकांनीही नवख्या गायकांच्या कलेचा आदर करत व त्यांना प्रोत्साहन देत मोठ्या जोशात कार्यक्रम पार पडला.

शब्दांकन : चंद्रशेखर गायगवळी

To Top