आरक्षण जाहीर; १० महिला करतील नगरपरिषदेच्या सभागृहात पदार्पण

shivrajya patra

मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेसाठी होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीच्या आरक्षणाची सोडत बुधवारी नगरपरिषदेच्या कार्यालय, समाज मंदिर इथं काढण्यात आली. या कार्यक्रमानुसार १० महिला सभागृहात पदार्पण करतील.

मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी १० प्रभाग असूून प्रत्येक प्रभागातून २ नगरसेवक परिषदेत निवडले जाणार आहेत. प्रभाग एक मधील १ अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला साठी आरक्षित असून १ ब जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. प्रभाग २ अ जागा अनुसूचित जाती महिला तर २ ब सर्वसाधारण गटासाठी आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तर ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे.

प्रभाग क्रमांक ४ मधील अ जागा अनुसूचित जाती तर ब जागा सर्वसाधारण महिला साठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक ५ मधील अ जागा अनुसूचित जाती महिला तर ब जागा सर्व साधारण आहे. प्रभाग क्रमांक ६ मध्ये अ जागा सर्वसाधारण महिला तर ब जागा सर्व साधारण गटासाठी आहे. 

प्रभाग क्रमांक ७ मध्ये अ जागा सर्वसाधारण महिला तर ब जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर ब जागा सर्वसाधारण आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तर ब जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये अ जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला तर ब जागा सर्वसाधारण गटासाठी आहे. ही नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी राज्यातील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीत 'कांटे की टक्कर' होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

त्याचा तक्ता पुढील प्रमाणे आहे.


To Top