श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या कार्याध्यक्षपदी ह.भ.प.राजेंद्र आरगडे

shivrajya patra

कोपरगांव : श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या कोजागिरी निमित्त ह.भ.प.काशिनाथ दादा काळोखे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंडळाचे कार्याध्यक्षपदी ह. भ. प. राजेंद्र आरगडे, उप कार्याध्यक्षपदी ह. भ. प. शरद वाणी यांची एकमताने निवड करण्यात आली. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी करताना वारकरी संप्रदायामध्ये कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत संपन्न होणाऱ्या कार्तिक स्नानाच्या पवित्र पुण्य पर्वकाळ असलेल्या काकड आरतीचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा हार-शॉल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.

अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये भजनी मंडळाचे चेअरमनपदी ह.भ.प.कचरू त्रंबक वाणी, व्हा.चेअरमन पदी ह.भ.प.भाऊसाहेब लक्ष्मण नाजगड, खजिनदार पदी ह.भ.प.बाळासाहेब दिनकर वाघ, सचिव पदी ह.भ.प.राजेंद्र गंगाधर बारे यांचा समावेश आहे.

या बैठकीसाठी विशेषत्वाने उपस्थित असलेले धामोरी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच विलासराव भाकरे, शिवाजीराव वाघ, बाबासाहेब उर्फ शिवराम वाणी या मान्यवरांचाही सन्मान व सत्कार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक मनोजराव माळी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक विलासराव माळी, गौतम बँकेचे विद्यमान संचालक रामराव माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सर्वश्री बाळासाहेब पगार, बाळासाहेब मांजरे, मंडळाचे मार्गदर्शक दगु वाणी, खंडेराव क्षिरसागर, पंडितराव हारळे, सारंगधर सोनवणे, शिवाजीराजे दवंगे, रावसाहेब जगताप, संतोष बागुल, भाऊसाहेब टिळे, हरिभाऊ दरेकर, अक्षय जेजुरकर, ज्ञानेश्वर सोनवणे, संदिप जगताप, नारायण हारळे आदींसह भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने हजर होते.

याप्रसंगी रामराव माळी, शिवाजीराव वाघ, बाबासाहेब वाणी आणि काशिनाथ काळोखे यांनी मनोगत व्यक्त करून मंडळाप्रती आभार व्यक्त करून भावी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. 

बैठकीसाठी उपस्थितांना आटविलेल्या दुधाचा प्रसाद, लाडु, फरसाणचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रावसाहेब जगताप यांनी केले तर ज्ञानेश्वर सोनवणे यांनी आभार मानले.

 शब्दांकन : दत्तात्रय घुले, कोपरगाव.

To Top