धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्टच्या वतीने अर्जुनसोंड इथं आरोग्य शिबिर; मोफत तपासण्या करून दिली औषधे

shivrajya patra

 

मोहोळ /विष्णु शिंदे : अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिसरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय धावून पुढे आलंय. उभयतांच्या निर्देशानुसार मोहोळ तालुक्यातील अर्जुनसोंड इथं धनराज गिरजी रुग्णालय हॉस्पिटल ट्रस्ट सोलापूर (मुळे हॉस्पिटल) यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केलं होते. या शिबिरात स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्य इत्यादी रुग्णाच्या तपासणी करून औषधे मोफत देण्यात आली.

सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर व जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सीना नदी काठावरील पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्य शिबिर आयोजन केले होते. यामध्ये विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, स्त्रीरोगतज्ञ डॉ. मंजुषा चिंचोळकर, डॉ. शुभंकर पाटील यांनी पुढील औषधोपचार मोफत करण्याचे आश्वासन दिले. स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, शल्य इत्यादी रुग्णाच्या तपासणी करून औषधे मोफत दिली.

याप्रसंगी आरोग्य सहाय्यक तानाजी बाबर, शाम पवार, पुजा गवळी, हनमंत चोपडे, गणपत सावंत, प्रताप शिंदे, अदिनाथ ढेरे, बजरंग सावंत, गोरख हावळे आदी उपस्थित होते.

To Top