सोलापूर/प्रतिनिधी : सीना नदीच्या पूराचे पाणी ओसरल्यानंतर शेतात काम करत असताना विषारी सापाने हाताला चावा घेतल्याने मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील महिलेचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात मृत्यू झाला. कमला मोहन गायकवाड असे मयत झालेल्या महिलेचं नाव आहे. 
काही दिवसाखाली लांबोटी येथील सीना नदीला पूर आला होता. पूरामुळे शेतातील मशागतीची कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. पूराचे पाणी ओसरल्यावर शनिवारी सकाळी त्या कुटूंबासमवेत शेतात काम होत्या.
अचानक त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला. यानंतर कुटूंबियांनी त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर लांबोटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तीन विवाहित मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
