झेडपी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अमोल साळुंके

shivrajya patra

सचिवपदी रवि बगले तर खजिनदारपदी हरिभाऊ कदम

सोलापूर : जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे उपसंपादक अमोल साळुंके, सचिवपदी रवि बगले तर खजिनदारपदी हरिभाऊ कदम यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद पत्रकार बीट पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरूवारी, 09 ऑक्टोबर रोजी शिवरत्न सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मार्गदर्शक प्रमोद बोडके यांनी काम पाहिले. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

उर्वरित पदाधिकारी असे- उपाध्यक्षपदी अमोगसिध्द मुंजे, विश्वनाथ बिराजदार, चिटणीसपदी रमाकांत साळुंके, सहसचिवपदी रेणुका वठारे यांची एकमताने निवड करण्यात आली. या सभेच्या सुरुवातीला मागील वर्षभरात केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

जिल्हा परिषद बीट पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी पाच जण इच्छुक होते, मात्र चर्चेनंतर बिनविरोध निवड करण्याचे ठरले अन् अमोल साळुंके यांची एकमताने निवड करण्यात आली. वर्षभरात जिल्हा परिषद पत्रकार संघाच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे नूतन साळुंके यांनी सांगितले. 

निवडीनंतर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे यांच्या हस्ते नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

--- चौकट

यांची होती प्रमुख उपस्थिती

बैठकीस मार्गदर्शक प्रशांत कटारे, बळीराम सर्वगोड, शरीफ सय्यद, संतोष आचलारे, संदीप येरवडे, मनोज भालेराव, अप्पासाहेब पाटील, राजकुमार सारोळे, शिवाजी सुरवसे, शिवाजी सावंत, श्रीशैल चिंचोळीकर, श्रीनिवास बनसोडे, विजयकुमार गुंजा, विश्वनाथ व्हनकोरे, गिरमला गुरव, अनिल शिराळकर, सचिन जाधव, राजेश भोई, सुदर्शन तेलंग उपस्थित होते.

To Top