यापूर्वीची मतदार यादी पूर्णपणे रद्द ; पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणीची 'ही' आहे शेवटची तारीख

shivrajya patra

सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी 01 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अधिकाधिक पात्र  मतदारांनी मतदार यादीत नांव नोंदवावे, असे आवाहन पदनिर्देशीत अधिकारी तथा तहसिलदार किरण जामदाडे यांनी केलं आहे. 

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणीची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२५ आहे. यापूर्वीची मतदार यादी पूर्णपणे रद्द केली असल्याने सर्व पात्र व्यक्तींनी पुनश्च अर्ज सादर करणे आवश्यक आहे. 

पात्र मतदारांनी जास्तीत जास्त फॉर्म भरून आपले नांव नोंदवावे. तसेच https://mahaelection.gov.in वेवसाईटवर पदवीधर नोंदणीची सुविधा उपलब्ध असून  पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी ऑफलाईन अर्ज तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर येथील निवडणूक शाखेत उपलब्ध करण्यात आले आहेत. 

मतदार नोंदणीची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 आहे. या तारखेपूर्वी पात्र व्यक्तींनी अर्ज करावेत, असं आवाहनही पदनिर्देशीत अधिकारी तथा तहसिलदार किरण जामदाडे यांनी केलं आहे.

To Top