
ते नालंदा नगर बुद्ध विहारात वर्षावास समारोपाच्या निमित्ताने आयोजित बुद्ध वंदनेच्या वेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बौद्ध महासभेच्या राज्य उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे, जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे, नालंदा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे, बौद्धाचार्य अजिन तळभंडारे, समता सैनिक दलाच्या जीओसी सुमित्रा केरू जाधव हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना बौद्ध महासभेच्या राज्य उपाध्यक्ष धमरक्षिता कांबळे म्हणाल्या की बौद्ध धम्म हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म असून या धर्मामध्ये कोणत्याही जाती प्रथेला स्थान नाही, कर्मकांडाला स्थान नाही.या धम्मात स्त्री आणि पुरुषांना समान स्थान आहे. 
यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे म्हणाले की, नालंदा नगर येथील बौद्ध विहार हे समाजप्रबोधनाचे केंद्र असून या विहारांमध्ये दर रविवारी प्रवचन मालिका संपन्न होते. त्याचप्रमाणे बौद्ध धम्माचे सगळेच उत्सव तसेच राष्ट्रीय उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न केले जातात. हे जागृतीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी बौद्धाचार्य अजित तळभंडारे, बौद्ध महासभेच्या महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा निर्मला कांबळे, उपाध्यक्ष नंदाताई काटे इत्यादींनी आपले विचार मांडले. बौद्ध वर्षावासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर शहरातील अनेक बुद्ध विहाराच्या शाखा महिला प्रमुख, महिला शाखांच्या पदाधिकारी महिला तसेच असंख्य बौद्ध बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेल्या सर्वच बौद्ध उपासक महिला तसेच बांधवांना भोजनदान करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे यांनी केले, सूत्रसंचालन जयश्री नडगिरी यांनी केले तर नालंदा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष शरद वाघमारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले. 
बौद्ध वर्षावास समाप्तीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुद्ध विहार समितीच्या जयश्री नडगिरी, सुशीलादेवी भालशंकर, आम्रपाली गाडे, राजश्री वाघमारे, रुक्मिणी खंडागळे, जयद्रथ खंडागळे, सुशीलचंद्र भालशंकर, जयश्री रणदिवे, गायकवाड मॅडम, कांबळे मॅडम, राणी कांबळे, अनुराधा बनसोडे, लक्ष्मी साबळे, आशा शिवशरण, सुमित्रा जाधव, सोनकांबळे मॅडम, मालन वाघमारे, कसबे मॅडम इत्यादी मान्यवरांन विशेष परिश्रम घेतले.
