सोलापूर : सोलापूरचे डॉ. सत्यवान वाघचवरे, सौ. शीला वाघचवरे, डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ. शुभांगी वाघचवरे, डॉ. अभिजीत वाघचवरे आणि डॉ. राजश्री वाघचवरे यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण महाप्रसादाची जबाबदारी स्वीकारली. त्यातून डॉ. वाघचवरे परिवारातर्फे दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद व परिसरातील 5, 000 पूरग्रस्तांना अन्नदान करण्यात आले.
दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लोक सहभागातून व जय हनुमान नवरात्र तरुण मंडळातर्फे औराद परिसरात सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी अतिवृष्टी व पूर परिस्थिती पाहता ही परंपरा खंडित होते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती, त्याचवेळी डॉ. वाघचवरे परिवार सामाजिक बांधिलकी जपत पुढं आल्याने गरमागरम अन्न वाटप करताना ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 
याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी उपसभापती संदीप टेळे, सरपंच शशिकांत बिराजदार, ग्रामसेवक निलप्पा येळमेली, डॉ. शिवपुत्र येलगुंडे , सर्कल सरकाझी, तलाठी रमेश बबलादी, माजी सरपंच शांतकुमार गडदे, लिंगराज पाटील, श्याम तेली, यल्लाप्पा कोळी, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, पोलीस पाटील सैपन बेगडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महासिद्ध हंडे, माजी उपसरपंच इरण्णा बनसोडे, उपसरपंच विठ्ठल नरोटे, माजी सरपंच सिद्धारूढ घेरडी, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा टेळे, अप्पाराव येडगे यांच्यासह ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते-ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होेते.
