सोलापूर : येथील केशव नगर पोलीस वसाहतीतील सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार अल्लीहुसेन जाकीरहुसेन सय्यद यांचं वृद्धापकाळात अल्पशः आजाराने आज रविवारी,05 ऑक्टोबर रोजी सकाळी एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते शहर पोलीस दलातून पंचवीस वर्षांपूर्वी सहायक फौजदार म्हणून सेवानिवृत्त झाले होते, मृत्यूसमयी ते 85 वर्षाचे होते.
त्यांची अंत्ययात्रा रविवारी सायंकाळी राहत्या घरापासून निघून अक्कलकोट रोड जडेसाब मुस्लिम कब्रस्तान येथे त्यांचा दफनविधी (सुपूर्द-ए-खाक) करण्यात आला.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, दोन मुले ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सिव्हील हॉस्पिटल पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार असलम सय्यद यांचे ते वडील होत.
