सोलापूर : वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान च्या वतीने होणाऱ्या 14 डिसेंबर राज्यस्तरीय वधूवर मेळावा संदर्भात निवड करण्यात आलेल्या स्वागत अध्यक्ष व कार्याध्यक्ष ह्याचा सत्कार करण्यात आला. स्वागताध्यक्ष अॅड. प्रदीप सलगर, कार्याध्यक्ष गिरीष ताबे, नितीन शेट्टी व अप्पासाहेब मनगुळी यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात सिध्देश्वर सहकारी बँक कर्मचारी व आपले संस्थेचे संचालक निवृत्त झाल्याबद्दल अनिल वजीरकर व श्री स्वामी समर्थ मूकबधिर शाळा धाराशिवचे विशेष शिक्षक भगवान चौगुले यांचा ड्रिम फाऊंडेशन संस्थेचा नेशन बिल्डर अवार्ड राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ह्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल शहापूरकर समाजाबद्दल चांगले मार्गदर्शन केले. 
समाज एकत्रित करण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कायम हिरीरीने भाग घेत असतो असंही त्यांनी यावेळी म्हटले.
या अकराव्या राज्यस्तरीय वधु-वर मेळावा संदर्भात उपस्थित मान्यवरांत प्रकाश वाले, सुधीर खरटमल, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शैलेश पाटील, दिपक अर्वै, सिध्दया स्वामी हिरेमठ यांनी प्रतिष्ठानच्या होणाऱ्या राज्यस्तरीय वधू-वर मेळावा संदर्भात मार्गदर्शन केले. यासाठी सर्वांनीमिळून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ह्या कार्यक्रमास सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू, एम. के. पाटील, गजानन नरखेडकर, ईरप्पा सालंकी, प्राचार्य गजानन धरणे, सुदीप चाकोते, उदय चाकोते, पानषट्टी सर, उद्योजक ऋषिकेश बोबडे, बसय्या स्वामी सांभाळ, आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापूरे व सर्व पदाधिकारी सर्व संचालक व सर्व सल्लागार व इतर मान्यवर उपस्थित होते.
ह्यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार केले तर सुनील शरणार्थी यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.
