पत्रकार कृती समितीचं जयंतीदिनी महात्मा गांधी आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

shivrajya patra

सोलापूर :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त  गुरूवारी,02 ऑक्टोबर रोजी सोलापूर रेल्वे स्थानक परिसरातील गांधीजींच्या पूर्णाकृती पुतळ्यास पत्रकार कृती समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे यांनी आपल्या भाषणात गांधीजींच्या विचारांचा उल्लेख करताना सांगितले की, “गांधीजींचे विचार सत्य आणि अहिंसेवर आधारित होते. स्वतःमध्ये बदल घडवून समाजासाठी सेवा करणे, साधे व सरळ जीवन जगणे आणि प्रेम, क्षमा व सहिष्णुता या मूल्यांना जीवनात स्थान देणे हे त्यांची शिकवण होती, असंही त्यांनी म्हटले.

अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी अहिंसक मार्गाचा पुरस्कार केला. कार्यक्रमात गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

तसेच अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी निमित्त सोलापूरकरांना पत्रकार कृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाला आप्पासाहेब लंगोटे यांच्यासह लतीफ नदाफ, सैपन शेख, नितीन करजोळे, ईनुस अत्तार, अस्लम नदाफ, यशवंत पवार, अमोल कुलकर्णी, अक्षय बबलाद, यशवंत फडतरे आदी पत्रकार उपस्थित होते.

To Top