पूरग्रस्तांना मैत्री ग्रुप सोलापूर सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचा एक हात मदतीचा

shivrajya patra

सोलापूर : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये एक हात मदतीचा या भावनेने येथील मैत्री ग्रुप सोलापूर पोलीस/कृषी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढं केला. त्यांनी कर्तव्य भावनेतून 100 किलो गहू व 100 किलो तांदूळ असं अन्नधान्य व नवीन चांगल्या स्थितीत असलेले कपडे, साड्या, पॅन्ट-शर्ट आणि चादरी-सतरंज्या अशी मदत मंगळवारी, 30 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी श्रीमती अंजली मरोड यांच्याकडे सुपूर्द केली.

सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये पूरग्रस्त व शेतकरी बांधवांना मदतीचा ओघ सर्व जिल्ह्यातून होत आहे. त्याचाच एक हिस्सा मदतीत सेवानिवृत्त मैत्री ग्रुपचे अध्यक्ष भिमराव राठोड, बाबुराव राठोड, नीलकंठ जाधव, रमेश पाटील, रेवणसिद्ध कोरे, चंद्रकांत मोटे, चंद्रकांत इनामदार, दशरथ रुपनवर, बळवंत नारायणकर, श्रीकांत पाटील, शाहीर घुगे, दिलीप पुकाळे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

To Top