आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती; बाह्यस्त्रोत संस्थांना आदेश

shivrajya patra

सोलापूर : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात येत आहे की, आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या कार्यारंभ आदेश दिनांक 05 ऑगस्ट 2025 अन्वये शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्यासाठी बाह्यस्त्रोत संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. या संस्थांमध्ये  छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था व महाराष्ट्र विकास ग्रुप यांचा समावेश आहे.

प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत एकूण तीन शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून, सदर आश्रमशाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदांवर (कंत्राटी स्वरूपात) पात्र उमेदवारांकडून 31 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाक यांनी दिली.

शैक्षणिक पात्रता व अर्हता पुढीलप्रमाणे:

- उच्च माध्यमिक शिक्षक – एम.ए./एम.एससी. (गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) व बी.एड. (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक 

- माध्यमिक शिक्षक – बी.ए./बी.एससी. (इंग्रजी/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) व बी.एड. (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक 

- पदवीधर प्राथमिक शिक्षक – डी.एड. व टीईटी-२/सीटीईटी-२ (अनिवार्य) तसेच टायट स्कोअर आवश्यक 

- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) – डी.एड. व टीईटी-१/सीटीईटी-१ (अनिवार्य) तसेच टेल स्कोअर आवश्यक 

- प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) – डी.एड. व टीईटी-१/सीटीईटी-१ (अनिवार्य) तसेच टेल स्कोअर आवश्यक 

इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील लिंकवर दिनांक 30 ऑक्टोबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरावा:

1. अपर आयुक्त नाशिक व ठाणे – https://scsmltd.com/   

2. अपर आयुक्त अमरावती व नागपूर – https://mvgcompany.in

सविस्तर माहिती संबंधित लिंकवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा.

To Top