सोलापूर : माजी सैनिक मेळाव्याचे मुख्यालय मेकॅनाईज्ड इन्फंट्री केंद्र व स्कूल अहिल्यानगर येथे शनिवारी, 25 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आ लं आहे. या मेळाव्यामध्ये CSD स्टॉल्स, फ्री चेकअप, फ्री औषधे व हेल्थ सल्ला केंद्र, निवृत्ती, पेंशन व सेवा विषयक अडचणींचे अभिलेख कार्यालय टीम मार्फत त्वरीत निवारण, वीर नारी, वीर माता-पीतांचा सत्कार, प्रमुख बँका व उद्योग संस्थाकडून मार्गदर्शन व नोकरीची माहिती, विविध बँकामार्फत पेंशन अपडेट व नवीन योजना, ई-सेवा व ऑनलाईन सुविधा काउंटर व इत्यादी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आयोजन केलं आहे.
मेळाव्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर पत्नी/वीर माता-पीता यांना निमंत्रित करण्यात येत आहे. तसेच सोलापूर जिल्हयासाठी चार बसेसची (55 Seater x 04 Bus) सदर मेळाव्यासाठी जाणे-येण्यासाठी सोय करण्यात आली आहे. मेळाव्यासाठी माजी सैनिकामधून काही स्वतःच्या अडी-अडचणी असतील, तर त्या सर्व कागदपत्रानिशी अर्ज स्वतः सोबत घेऊन मेळाव्याचे ठिकाणी सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
तसेच पहिली बस पंचायत समिती कार्यालय अक्कलकोट येथून सकाळी 5.00 वाजता निघेल व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर येथे सकाळी 5.30 वाजता पोहचेल. दुसरी बस जिल्हा सैनिक कार्यालय, सोलापूर येथून निघणार आहे. पहिली व दुसरी बस सकाळी 5.30 वाजता अहिल्यानगरला मार्गस्त होतील. तिसरी बस मंगळवेढा बस स्थानक येथून 5.00 वाजता सुटेल. चौथी बस माजी सैनिक मुलांचे वसतिगृह, सांगोला येथून निघेल. तिसरी आणि चौथी बस माजी सैनिक विश्रामगृह पंढरपूर येथे 5.30 वाजता पोहचतील व अहिल्यानगरला मार्गस्त होतील, असे पत्रकात नमूद आहे.
अधिक माहितीसाठी (अप्पासाहेब कोडग, संपर्क क्रंमाक 7387251400 व बाळासाहेब खराडे, संपर्क क्रंमाक 7744030077) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
