(फोटो ओळ : रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड 2025’ – अभिनेता सोनू सूद त्यांच्या हस्ते स्वीकारताना पी. पी. पटेल अँड कंपनीचे जयेश पटेल, शेजारी सुनील माहेश्वरी व मोतीलाल ओसवाल)
100 शाळांमधील डिजिटल क्लासरूम प्रकल्पासाठी सन्मान
मुंबई : भारतामधील धातू पावडर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी पी. पी. पटेल अँड कंपनी हिला शिक्षण क्षेत्रातील प्रभावी सामाजिक उपक्रमासाठी ‘रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड 2025 ' (विशेष परीक्षक पुरस्कार-उमलते क्षेत्र विभाग) ने सन्मानित करण्यात आलं आहे. 
मुंबईस्थित मोतिलाल ओसवाल टॉवर्स, इथं 08 ऑक्टोबर रोजी आयोजित सोहळ्यात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयेश पटेल यांनी समारंभाचे मुख्य अतिथी मोतिलाल ओसवाल यांच्या उपस्थितीत आणि विशेष अतिथी अभिनेता व समाजसेवक सोनू सूद यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमाचे यजमान रोटरी क्लब ऑफ मुंबई पायर असून रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 चे जिल्हा राज्यपाल डॉ. मनीष मोटवानी यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला.
‘रोटरी डीजी क्लासरूम – रोटरी की पाठशाला’ : शिक्षणात डिजिटल क्रांती
‘रोटरी डिस्ट्रिक्ट 3132’ च्या “प्रत्येक क्लब – एक शाळा” या संकल्पनेखाली पी. पी. पटेल अँड कंपनी ने 100 शाळांमध्ये रोटरी डीजी क्लासरूम (रोटरी की पाठशाला) हा अभिनव उपक्रम राबविला आहे.
या डीजी क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना खालील अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत –
Mi Smart TV (43 इंच Android Model),
लॅपटॉप व व्हाय-फाय कनेक्टिव्हिटी,
मराठी-इंग्रजी द्विभाषिक शैक्षणिक ई-कॉन्टेंट,
शिक्षक प्रशिक्षण सत्रे आणि विद्यार्थी सहभाग उपक्रम,
Kompkin Maestro हे सर्वसमावेशक शैक्षणिक सॉफ्टवेअर आहे, जे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असून इयत्ता 5 वी ते 10 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी (मराठी, इंग्रजी व सेमी-इंग्रजी माध्यमासाठी) तयार करण्यात आले आहे.
सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट आहेत –
• 2D/3D अॅनिमेशन व्हिडिओज – गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, इंग्रजी विषयांसाठी
• शिष्यवृत्ती प्रश्नसंच – इ.5 वी व 8 वीसाठी
• डिजिटल लायब्ररी – पूरक सामग्रीसह :
• स्वच्छ भारत, एकलव्य 5,000+ प्रश्नसंच, ICT (MSCIT ७०%)
• Career Disha – 250+ करिअर मार्गदर्शन (मराठी, इंग्रजी, हिंदी)
• Learn English Soft Skills (10 विषय)
• Value Education (46 विषय)
• अवयवदान जनजागृती
• 1 व्हिडिओ CPR वर व 1 व्हिडिओ First Aid वर
• हायस्कूल मॉड्यूल्स:
• विज्ञानासाठी 3D प्रयोग सिम्युलेशन
• बोर्ड परीक्षांसाठी MCQ बँक
• डिजिटल अटेंडन्स आणि प्रगती ट्रॅकिंग सिस्टीम
या सॉफ्टवेअरला 3 वर्षांचे carry-in upgrades आणि आजीवन वैधता (Lifetime validity) देण्यात आली आहे.
या डीजी क्लासरूम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आकर्षक, समजण्यास सुलभ आणि प्रात्यक्षिक झाले आहे. या प्रकल्पामुळे 70, 000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचले असून, ग्रामीण व शहरी शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी हे एक प्रभावी पाऊल ठरले आहे.
... सामाजिक बांधिलकीचा गौरव : जयेश पटेल
“हा पुरस्कार आमच्या ‘शिका, कमवा व परतफेड करा’ या तत्वज्ञानाची खरी पावती आहे. आम्ही सीएसआर केवळ जबाबदारी म्हणून नव्हे, तर समाजाचे देणे फेडण्याची संधी म्हणून पाहतो. रोटरीच्या माध्यमातून आम्हाला हजारो विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची शक्ती पोहोचवता आली, हीच आमच्यासाठी खरी प्रेरणा आहे.”
कंपनी येत्या काळात शिक्षण, आरोग्य व समाजकल्याण क्षेत्रातील कार्य आणखी व्यापक करण्याचा संकल्प बाळगते, असं व्यवस्थापकीय संचालक जयेश पटेल यांनी असं सांगितले.
....चौकट
कंपनीविषयी थोडसं !
पी. पी. पटेल अँड कंपनी ही 1996 साली स्थापन झालेली भारतातील धातू पावडर निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनीचे उत्पादन केंद्र धाराशिव जिल्हा, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी इथं आहे. येथे कॉपर, ब्राँझ आणि टिन या धातूंच्या उच्च दर्जाच्या पावडरचे उत्पादन केले जाते.
ही उत्पादने ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि पुनर्नवीनीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. कंपनीने उद्योगातील उत्कृष्टतेसोबतच सामाजिक जबाबदारी आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान हे ध्येय कायम ठेवले आहे.
‘रोटरी इंडिया नॅशनल सीएसआर अवॉर्ड 2025’ हा सन्मान कंपनीच्या दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव आहे.
