दिलीपराव माने विद्यालयाचे हॉलीबॉल स्पर्धेत यश; मुलींचा संघ विजेतेपदी तर मुलांचा उपविजेतेपदावर

shivrajya patra

उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाच्या मुलींच्या संघाने तालुकास्तरीय 17 वर्षाखालील हॉलीबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले तर मुलांच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. दोन्ही संघांनी तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेची यशस्वी परंपरा कायम राखली. मुलींच्या संघाची जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

या स्पर्धेत कर्णधार स्नेहल पवार, प्रतीक्षा कांबळे, श्रेया पवार, अनुष्का पवार, तहसीन शेख, समीक्षा डोके, प्रणिता बनसोडे, जोया पटेल अल्फीझा काझी, उत्कर्षा वानकर, संस्कृती कानडे, वैष्णवी कांगरे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना सहशिक्षक अश्फाक अत्तार, क्रीडा प्रमुख धर्मदेव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, मार्डी वि. का. से. सोसायटी चेअरमन बाबा पाटील, सेवालाल नगरचे माजी सरपंच संजय वडजे, माजी सभापती रजनी भडकुंबे, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी  त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.

To Top