उद्योजकांसाठी 'अर्थसंवाद' कार्यशाळेचे आयोजन

shivrajya patra

बार्शी : राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी, एसबीआय बँक सोलापूर आणि एचडीएफसी बँक सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी येथे विविध उद्योग-व्यवसायांसाठी कर्ज योजनांची माहिती देणारी 'अर्थसंवाद' ही विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता बार्शी पोस्ट ऑफिसच्या पाठीमागील हॉटेल रामकृष्ण एक्झिक्यूटिव्ह इथं ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती संयोजक शिवाजीराव पवार यांनी यांनी दिलीय. 

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, यामध्ये PMEGP, CMEGP, AIF, PLEJ, NABARD, PMFME, CGTMSE, MIDC, वेअर हाऊस आणि कोल्ड स्टोरेज यांसारख्या विविध शासकीय व निमशासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. शेती आणि पूरक प्रक्रिया उद्योगांसाठीच्या योजनांवरही विशेष मार्गदर्शनाबरोबर 01 लाख ते 100 कोटी रुपयांपर्यंतच्या विविध कर्ज योजनांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून एस.बी.आय. सोलापूरचे चीफ मॅनेजर राहुल वर्मा, एच.डी.एफ.सी. पुणेचे एरिया हेड प्रतिप मुखर्जी, एच.डी.एफ.सी. बार्शीचे एरिया ब्रँच मॅनेजर आकाश पोळ-पाटील आणि मणिपाल टेक्नॉलॉजी बारामतीचे एरिया सेल्स मॅनेजर ऋषिकेश उकिरडे उपस्थित राहणार असल्याचं शिवाजीराव पवार यांनी म्हटलंय.

कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार आणि चहा-पानाची व्यवस्था करण्यात आलीय. 

कार्यशाळेसाठी पूर्व-नोंदणी होणे आवश्यक आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9822245292 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन संयोजक शिवाजीराव पवार यांनी केलं आहे. 

To Top