बहुजन मुक्ती पार्टी राष्ट्रीय अधिवेशनाच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा

shivrajya patra

सोलापूर : येत्या 04 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या बहुजन मुक्ती पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या जिल्हा नियोजनाची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी, 26 सप्टेंबर रोजी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बहुजन मुक्ती पार्टी - प्रदेशाध्यक्ष (युवा संघटन) दिपक शिंदे होते. यावेळी राष्ट्रीय अधिवेशनाच्या अनुषंगाने अनेक मुद्द्यावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली.

बहुजन मुक्ती पार्टीचे 03 रे राष्ट्रीय अधिवेशन शनिवारी,04 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या चेंबूर परिसरातील तिलक नगरात लोकमान्य तिलक क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलंय. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी आमदार बाबुराव माने (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) यांच्या हस्ते होईल.

या अधिवेशनास मुख्य अतिथी म्हणून लाभले आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय प्रभारी प्रवेंद् प्रताप सिंह (नई दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष दासराम नायक (नई दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अनिल माने (ब. मु. पा. युवा संघटन-नई दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल (रा.प.व.म नई दिल्ली), राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मगन ससाणे (इं. मे. प्रो. अ. नई दिल्ली) व राष्ट्रीय अध्यक्ष इं.सय्यद मकसूद (रा. मु. मो. नई दिल्ली) यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा (नवी दिल्ली) चे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम हे अधिवेशनाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. 

या अधिवेशनात, 

01)मतदानाचा अधिकार हा शासक बनण्याचा आणि शासक बनवण्याचा अधिकार आहे, परंतु असंवैधानिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) मतदानाचा अधिकार रद्द करणे आणि SRI (सुधारणा) द्वारे SC/ST/OBC आणि अल्पसंख्याकांना मतदान यादीतून वगळणे हे शासक जातींचे षड्यंत्र आहे-एक गंभीर चर्चा!

आणि

02) ओबीसींची जात-आधारित जनगणना न करणे, मंडल आयोग आणि सच्चर आयोग लागू न करणे, हिंदू आणि मुस्लिमांच्या नावाखाली आपापसात संघर्ष निर्माण करणे, ही सत्ताधारी वर्गाची षड्यंत्रकारी चाल आहे-एक चर्चा... ! ह्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी व चर्चेतून मार्ग काढण्यासाठी हा विशाल राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. 

या अधिवेशनास देशभरातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, शुभचिंतक व हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातून देखील बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टी (युवा संघटन) चे प्रदेश प्रवक्ता ॲड. योगेश शिदगणे यांनी दिलीय.

To Top