धामोरी : कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता धामापूर वि. वि. कार्यकारी सोसायटी लि. धामोरी या संस्थेच्या सभागृहात विविध विषयावर विचार विनिमय करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे चेअरमन ज्ञानदेव मांजरे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेत, मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, मयत सभासद, थोर नेते, शास्त्रज्ञ यांना भावपूर्ण श्रद्धांजली सन 2024-2025 या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके वाचून मंजूर करणे. सन 2025-2026 या वर्षाकरिता केलेल्या अंदाज पत्रकास मान्यता देणे, 
संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्याकडील कर्जबाबत कलम 75/5 नुसार चर्चा करणे, ऑडिट मेमो दोष दुरुस्ती रिपोर्टसह वाचून मंजूर करणे, शासन अध्यादेश परिपत्रक दिनांक 29 जुलै रोजीच्या पत्रान्वये राज्यातील नागरी/ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांना सुधारित आदर्श उपविधी लागू करण्याबाबत अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी संस्थेचे व्हा. चेअरमन दत्तात्रय वाघ, संचालक शिवाजीराव पेखळे, सुनील गाडे, कृष्णराव मांजरे, भिकन शेख, सौ. अर्चना भाकरे, सौ. गयाबाई दिघे, लहू पवार, योगेश जेजुरकर, राजेंद्र पवार, गणेश जाधव, संजय मोरे, चैतन्य भाकरे, कायदेविषयक सल्लागार अॅड. गणेश भाकरे तसेच सेवक वर्ग प्रशांत कदम, सागर वाघ, कैलास जावळे, निनाद क्षीरसागर, नारायण माळोदे, बाळासाहेब वाघ, दगू सोनवणे आदी सभासद मंडळ त्याचबरोबर संस्थेचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शब्दांकन : दतात्रय घुले
