सोलापूर : महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान मांडला आहे. सोलापूर जिल्हा आणि परिसर नेहमी दुष्काळी म्हणून ओळखला जातो, परंतु यावेळी मात्र पावसाने रौद्ररूप धारण केलंय. सर्व नदी-नाले ओसंडून वाहू लागलेत. निसर्गाच्या या अचानक झालेल्या माऱ्यात शेतकरी, कष्टकरी आणि गांव गाड्याचे संसार ओलेचिंब झाले वा चिखलमय झालेत. त्यांच्यासाठी ♦️एक हात मदतीचा-पूरग्रस्तांसाठी♦️हा उपक्रम बहुजन मुक्ती पार्टीकडून हाती घेण्यात आल्याची माहिती ॲड. योगेश शिदगणे यांनी दिलीय.
गेल्या 05 महिण्यापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होतोय. या पावसानं शेतकऱ्यांची शेतातील खरीपाची पिकं होत्याची नव्हती झालीत. अतिवृष्टी आणि पूरामुळं शेती-शिवाराबरोबर गोरगरिबांचे घरदार आणि संसार जलमय झालेत. आयुष्यभर राबवून जमवलेली कष्टाची पुंजी गमवावी लागली आहे. त्यांचं सर्वस्व निसर्गानं हिरावून नेलंय. आज अनेक लोकांनी निवाऱ्यामध्ये आश्रय घेतला आहे.
बहुजन मुक्ती पार्टीतर्फे आम्ही पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. आमच्यामार्फत आपणही मदतीचा एक हात पुढे करून या नैसर्गिक आपत्तीत माणूस असल्याचं कर्तव्य पूर्ण करावं, अशी अपेक्षा आहे.
आम्ही आपल्याला आवाहन करतो की, पूरग्रस्तांना मदत म्हणून टिकाऊ खाद्यपदार्थ, अन्नधान्य, कपडे, चादर, सतरंजी, भांडी, पैसे असे आपणास शक्य होईल, तेवढे बहुजन मुक्ती पार्टीकडे दिल्यास आम्ही ते पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवू, पूरग्रस्तांना मदतीचा एक हात देण्यासाठी 7385353722 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन बहुजन मुक्ती पार्टी (युवा आघाडी) प्रदेश प्रवक्ता ॲड. योगेश शिदगणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे.
https://www.facebook.com/share/v/1BRg3J1too/?mibextid=wwXIfr
