मोहोळ/यासीन आत्तार : सद्यस्थितीत चालू असलेले महसुल विषयक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येऊन निकाली काढण्यासंबंधी प्राधान्याने कार्यवाही करणे निर्धारित करण्यासाठी शुक्रवारी,19 सप्टेंबर रोजी रस्ता अदालत तहसिल कार्यालय, मोहोळ येथे दुपारी 2.30 वा. आयोजित केली आहे. या दिवशी तालुक्यातील ज्यांचे रस्तेविषयक वाद मिटविण्याचे अथवा त्यामध्ये तडजोड करण्याची आहेत, अशा प्रकरणांत सहभागी होऊन उपस्थित रहावे.
ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते/हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाणारे पायमार्ग/गाडीमार्ग या रस्त्याचे सीमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याबाबतची तालुकास्तरीय कार्यपध्दतीबाबत निश्चित करणकरिता तहसिल कार्यालय मोहोळ यांचे कार्यालयाकडील जी प्रकरणे प्रलंबित आहेत, ते निकाली काढण्याचा शासनाचा अग्रकम आहे.
तसेच मोहोळ तालुक्यातील मंडळ स्तरावर 18 सप्टेंबर रोजी विवादग्रस्त फेरफार नोंदीबाबत मंडळ अधिकारी मोहोळ, अनगर, शेटफळ, पेनूर, सावळेश्वर, वाघोली, टाकळी (सि.), कामती (बु.) व नरखेड या मंडळात विवादग्रस्त फेरफार नोंदीबाबत तडजोड करण्याची आहेत, अशा प्रकरणांत सहभागी होऊन उपस्थित रहावे, असं आवाहन मोहोळ तहसीलदार कार्यालय,यांच्या वतीने करण्यात आलं आहे.
