शिवसेनेचे श्रीनिवास उपळकर यांचा 'माझा प्रभाग साक्षरता प्रभाग' उपक्रम
पंढरपूर : पंढरपूर येथे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर यांच्या संकल्पनेतून माझा प्रभाग, साक्षरता प्रभाग या उपक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी IPS प्रशांत डगळे साहेबांच्या हस्ते शालेय साहित्याचे उद्घाटन करत प्रभागातील विद्यार्थ्यांना सस्नेह भेट देत करण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी डगळे यांनी, विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. भविष्यात चांगल्या प्रकारे अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करा, शिक्षणामुळे चांगल्या नोकऱ्या मिळतात, आत्मविश्वास वाढतो आणि समाजात प्रगती होते, असे मार्गदर्शन केले.
शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले आणि शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख महेश साठे यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबविण्यात आला. 
यावेळी श्रीनिवास उपळकर यांनी सांगितले की, शिक्षण हे व्यक्तीला ज्ञान, कौशल्ये आणि चांगले मूल्ये शिकवते, ज्यामुळे त्याचे जीवन अधिक चांगले आणि स्थिर होते. शिक्षणामुळे चांगल्या नोकऱ्या मिळतात, आत्मविश्वास वाढतो आणि समाजात प्रगती होते. शिक्षण हे गरिबी आणि बेरोजगारी कमी करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.
त्याचबरोबर शिक्षण हे कोणत्याही व्यक्तीला किंवा देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी माझा प्रभाग साक्षरता प्रभाग हा उपक्रम हाती घेऊन सुरुवात आपल्या भागातून झाली पाहिजे, यासाठी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देण्याचा संकल्प हाती घेतला, असे श्रीनिवास उपळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना शहर प्रमुख श्रीनिवास उपळकर, समाजसेवक गणेश भिंगारे, समाजसेवक ईश्वर गंगेकर, विनायक पिंगळे, शैलेश उदगीरकर, अभय बोंडफळे, विशाल डोंगरे, प्रथम भिंगारे आदींसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
