मुंबई : भीमा कोरेगाव विजयस्तंभ अतिक्रमण व प्रशासकीय लढा या ऐतिहासिक न्यायालय लढाईची माहिती देण्यासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष व कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची शुक्रवारी, 12 सप्टेंबर रोजी विधानभवन येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. 
याप्रसंगी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना लढ्याची सर्व माहिती देऊन सोबत निवेदन दिले. यावेळी संदेश भूमीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते आनंद सैंदाणे व इतर उपस्थित होते.
