साकोली येथे आझाद समाज पार्टीची पार पडली पक्ष प्रवेश व समीक्षा बैठक

shivrajya patra

साकोली/अभय रंगारी : आझाद समाज पार्टी ची (कांशीराम) जिल्हा भंडाराची समीक्षा बैठक आणि पक्षप्रवेश ची बैठक शनिवारी,13 सप्टेंबर रोजी साकोली विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत, आजाद समाज पार्टी (कांशीराम ) याबद्दल सखोल माहिती तसेच पार्टीचे उद्देश कार्य तसेच नगीना संसद अॅडवोकेट चंद्रशेखर आझाद  यांचं त्याग कार्य सांगण्यात आला. 

आझाद समाज पार्टी (कांशीराम) चा प्रवास सदस्यांनी सदस्यांना समजावून सांगितला. त्या सगळ्यांना ऐकून सर्व कार्यकर्ते प्रभावित झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्व. कांशीराम आणि अॅडवोकेट चंद्रशेखर आझाद यांच्या कार्याला भंडारा जिल्ह्यातील काना-कोपऱ्यात पोहोचण्याचा कार्य जोमाने करून असे सगळ्यांनी आश्वासन दिले तसेच उपस्थित अनेक लोकांनी पार्टीची सदस्यता ग्रहण केली. 

यावेळी प्रमुख उपस्थिती पूर्व विदर्भ सचिव ज्ञानचंद्र जांभुळकर, भंडारा जिल्हा महासचिव अश्विन गोस्वामी, भंडारा जिल्हा सचिव अमोल भिवगडे, भंडारा जिल्हा सचिव रवींद्र जनबंधू, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उकनकर, सदस्य गण बाबुराव मेश्राम, शिवप्रसाद मेलाक, भूपेंद्र मेश्राम, रवींद्र हुमणे, राजकुमार बोदरा, प्रकाश गायधने, सचिन रंगारी, लीलाधर रामटेके, मोना मेश्राम, शितल कोटांगले, साहिल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

To Top