पडळकर यांच्या वक्तव्याचा बॅनरला जोडे मारून राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी नोंदविला निषेध

shivrajya patra

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार सोलापूर शहराच्यावतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. जयंत पाटील यांच्यासंबंधी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अश्लाघ्य व संतापजनक बेताल वक्तव्याचा निषेध नोंदवत पक्ष कार्यकर्त्यांनी शनिवारी चार हुतात्मा पुतळा चौकात आमदार पडकरांच्या बॅनरला जोडे मारून व तीव्र शब्दात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. 

यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर नलिनी चंदेले, जनरल सेक्रेटरी सूर्यकांत शेरखाने, शहराध्यक्ष सामाजिक न्यायविभाग अजित पात्रे, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे, लता फुटाणे, रेखा सपाटे, महिला प्रदेश सरचिटणीस मनिषा माने, शहर दक्षिण विधानसभा अध्यक्ष नुरोद्दीन मुल्ला, लता ढेरे, नसीमा शेतसंदी, मोनिका सरकार, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, कल्पना पराडे, शहर उत्तर विधानसभा महिलाध्यक्षा सुनीता दळवी, वैद्यकीय विभाग अध्यक्ष व्ही. डी. गायकवाड, बळीराम एडके, सूर्यकांत शिवशरण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top