बक्षी हिप्परगे ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी भाऊराजे जाधव

shivrajya patra

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे येथील ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंचपदी सर्वानुमते भाऊराजे जाधव यांची निवड करण्यात आली. भाऊराजे यांनी यांनी सर्वांचे आभार मानले.

भाऊराजे यांनी गेली चार वर्ष सामाजिक, धार्मिक क्षेत्रेत खूप चांगले काम केले. याचबरोबर पॅनलमध्ये ठरल्याप्रमाणे सर्व सदस्यांनी यांना संधी दिली, मिळालेल्या संधीचे नक्कीच सोनं करु, असा सत्काराला उत्तर देताना नूतन सरपंच जाधव यांनी विश्वास व्यक्त केला.

यावेळी माजी सरपंच मनोज महाडीक, विश्रांत गायकवाड, सिताराम राठोड, नागनाथ जाधव, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा कोळेकर  शिवाजी राठोड, शिवाजी निकम, महेश माने, राम जाधव, राहुल जाधव, सुहास गायकवाड, नाना जाधव, बाबासाहेब माने (उद्योजक), गणेश निकम ,  रामप्रभु निकम, विनोद महाडीक, गणेश शिंदे, अमोल जाधव, याबरोबरच सर्व गावकरी उपस्थित होते.

नुतन सरपंच भाऊराजे जाधव यांना उपस्थितांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सरपंच निवडी प्रसंगी नूतन सरपंचांना शुभेच्छा देताना प्रा. संजय जाधव , सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण केत, दयानंद महाविद्यालयाचे माजी प्रा. मारुतीराव मस्के,  दोड्डीचे मुख्याध्यापक गंगाधर डोके, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र निकम, तंटामुक्त अध्यक्ष नाना जाधव आदि उपस्थित होते. 

To Top