सोलापूर : ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात महमद पैगंबर (स.) यांच्या 1500 व्या जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीतील हजारो मुस्लिम बांधवांना मराठा समाजाच्यावतीने बिस्किट वाटप करण्यात आले. शहरातील विविध भागातून महमद पैगंबर ( स.) यांच्या जयघोषात 
निघालेल्या लहान -थोर बांधवांची रॅली विजापूर वेस येथे आगमन झाल्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर बिस्किटे वाटप करण्यात आले. या बंधुभाव जोपासणाऱ्या उपक्रमाचं विविध संघटनांकडून कौतुक करण्यात आले. 
बाळासाहेब भोसले, तानाजी सावंत, लक्ष्मण भोसले, प्रा. मोहित निकम, पोपट भोसले, स्वराज्य चव्हाण, सुरेश ननवरे, सौरभ भांड, शिवू कलशेट्टी, ज्ञानेश्वर ताकमोगे, विक्रम माने आदी उपस्थित होते. या उपक्रमाकडं कार्य एकोप्याचं; संदेश बंधुभावाचा म्हणून पाहिलं जातंय.


