सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील सुपुत्र अॅड. चंद्रकांत अमोगसिध्द नाईकवाडे यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता, वर्ग-अ या पदावर जळगांव जिल्ह्यातील पाचोरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग-१ यांच्या न्यायालयात नेमणूक झाली आहे.

सन २००५ पासून सोलापूर जिल्ह्यातील, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी न्यायालयात दिवाणी व फौजदारी केसेस चालविल्या. या सतरा-अठरा वर्षापासून पक्षकारांना न्याय मिळवून दिला. सहकारी व सावकारी केसेस हाताळण्यात हातखंडा असलेल्या अॅड. नाईकवाडे यांनी सावकारी जाचातून अनेक पक्षकारांना न्याय मिळवून दिला. त्यांनी बार्शी येथील न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काही काळ सेवा बजावली आहे.
अॅड. चंद्रकांत नाईकवाडे यांच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचं कौतुक करण्यात येत आहे.


