बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला अखंड मराठा समाज शहर-जिल्हाचा पाठिंबा

shivrajya patra

सोलापूर : बंजारा समाजाच्या बांधवांनी एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी मंगळवारी, सोलापुरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, या बंजारा समाजाच्या आरक्षणाला वेळोवेळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. त्याचाच भाग म्हणून अखंड मराठा समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने बंजारा समाजाच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. 

संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शासनाला हैदराबाद गॅझेट लागू करायला भाग पाडले. त्याच गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजासह, बंजारा समाजालाही त्यांच्या नोंदी मिळायला फायदा होत आहे.

यावेळी कर्नाटक बंजारा समाजाचे धर्मगुरू जुगनू महाराज, युवराज राठोड, जय जवान जय किसान संस्थेचे प्राचार्य रवी चव्हाण, विजापूरचे आमदार देवानंद चव्हाण, नगरसेविका अश्विनी चव्हाण, सुरज जाधव, अखंड मराठा समाजाचे रवी मोहिते महेश घाडगे, रविकांत भोपळे, अॅड गणेश कदम, पोपट भोसले, विकास कदम, इंगोले महाराज उपस्थित होते. यावेळी बंजारा समाज बांधवांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार व्यक्त केले.

To Top