सकाळी ११.३० होईल मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ : आमदार विजयकुमार देशमुख

shivrajya patra

सोलापूर : येथील मानाचा आजोबा गणपतीची विसर्जन मिरवणुक पारंपारिक वाद्यांसह सकाळी ११.३० वाजता निघून लवकरात लवकर विसर्जन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती श्रध्दानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपतीचे ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजोबा गणपती मंदिरातील पत्रकार परिषदेत दिली.

वेळेत विसर्जन होण्यासाठी सार्वजनिक मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळात सहभागी होणाऱ्या उत्सव मंडळांनी लवकरात-लवकर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करावी, असं आवाहन ट्रस्टी अध्यक्ष आ. विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना केले.

या पत्रकार परिषदेस ट्रस्टी उपाध्यक्ष शिवानंद मेंडके, सचिव अनिल सावंत, खजिनदार चंद्रशेखर कळमणकर, गुरुनाथ निंबाळे, राहुल कुमने, किरण अक्कलकोटे, केदार वनारोटे, शिवानंद सावळगी अणि अनिल नंदीमठ यांची उपस्थिती होती.

To Top