सोलापूर : येथील नई जिंदगी परिसरातून एक एच. एफ. डिलक्स व एक सप्लेंडर प्लस अशा 02 मोटार सायकल चोरीसंबंधी एम. आय. डी. सी. पोलीस ठाण्याकडं दाखल 02 गुन्हे उघडकीस आणण्यात शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले.विधीसंघर्ष बालकानं दिलेल्या माहितीनुसार 02 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या.
गुन्हे शाखेचे पोउपनि अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकाने मिळालेली गोपनिय माहिती आणि तांत्रीक माहीतीच्या आधारे तपास केला असता, विजय नगर भाग-2, मधील एका विधीसंघर्ष बालकाने चोरी केल्या असून, त्या त्याच्या घरासमोर लाऊन ठेवल्याची माहीती मिळाली. 
त्यानुसार विधीसंघर्ष बालकाच्या घराजवळ पाहीले असता, तेथे एक एच.एफ. डिलक्स व एक स्पलेंडर अशा 02 मोटार सायकली दिसूनन आल्या. विधीसंघर्ष बालकाकडे त्याच्या वडीलासमक्ष विचारपूस केली असता, त्यानं मौलाना आझाद चौक, नई जिंदगी येथून एच.एफ.डिलक्स मोटार सायकल क्र. MH 13 CY 0563, तसेच सिध्देश्वर नगर भाग-2/3, येथून स्पलेंडर मोटार सायकल क्र. MH 13 DD 0533 चोरल्याचे सांगितले. त्या 02 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद आणि चालक सतिश काटे यांनी पार पाडली.
