सोलापूर : श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ आयोजित नवरात्रोत्सवाला 22 सप्टेंबर रोजी शुभारंभ झाला. सोमवारी सायंकाळी धार्मिक विधीने गरबीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी दिली.
गुजराती समाज बांधवांचा नवरात्र हा पारंपरिक उत्सव असून, दररोज सायंकाळी गरबीची पूजा पार पाडली जाते. देवीच्या उपासनेनंतर गरबा व दांडिया खेळांचा रंगतदार कार्यक्रम होतो, ज्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. 
यावेळी दररोज विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत. अष्टमीच्या दिवशी होम-हवन यासारखे धार्मिक विधीही आयोजित करण्यात येतील.
ह्या वर्षी नवरात्रोत्सवाचे मुख्य प्रायोजक फालकॉफीक्स व यश डेव्हलपर्स आणि टाटा मोटर्स इवा असून, इतरही अनेक प्रायोजकांनी उत्सवासाठी सहकार्य केले आहे.
